बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतचं सलमानने त्याच्या आगामी गाण्याचा टीझर शेअर केला आहे. पण हा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सलमानला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. सलमानच्या या आगामी गाण्याचं नाव डान्स विथ मी असं आहे. गाण्याच्या सुरुवातीला सलमान शूलेस बांधताना दिसत आहे. हा टीझर २४ सेकंदाचा आहे. या टीझरमध्ये सलमान फक्त गात नाही तर डान्स करताना देखील दिसत आहे. हा टीझर पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. तर दुसरीकडे त्याला अनेकांनी ट्रोल देखील केले आहे.

आणखी वाचा : अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”

आणखी वाचा : बॅंकर असलेल्या मौनी रॉयच्या पतीच्या संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका नेटकरी सलमानला ट्रोल करत म्हणाला, एक ढिंचॅक पूजा तर तुमच्यात पण लपलेली आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, भाई तुम्हीच सगळं करणार तर आम्ही काय करणार, हीरो पण तुम्हीच, निर्मातेपण तुम्हीच, दिग्दर्शक पण तुम्हीच, लेखक पण तुम्हीच आमच्यासाठी काही तरी सोडा. तिसरा नेटकरी म्हणाला, भाई आता तरी थांबा किती पैसे कमवणार, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी सलमानला ट्रोल केले आहे.