scorecardresearch

६ वर्षांपासून सोहेल- सीमाचा घटस्फोट न होण्याचा प्रयत्न करत होता सलमान खान, पण…

सोहेल आणि सीमा १९९८ मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत.

salman khan, Sohail Khan, Seema Khan
सोहेल आणि सीमा १९९८ मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत.

Sohail Khan Seema Khan Divorce : बॉलिवूडमध्ये अनेक घटस्फोट झाले आहेत. अनेक जोडप्यांमध्ये दुरावे आले आहेत. यात आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. लग्नाच्या २४ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ते दोघे फॅमिली कोर्टाबाहेर दिसले होते. काही वर्षांपूर्वी सलमान आणि सोहेलचा भाऊ अरबाज खानने पत्नी मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतला होता. आता सोहेलच्या घटस्फोटाची बातमी खान कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. सलमानने हे नाते वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही झालं नाही.

सीमा खान अनेक वर्षांपासून पती सोहेल खानपासून वेगळी राहत होती. ‘द फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्हज’मध्ये सीमा खानने सांगितले होते की ती आणि सोहेल एकत्र राहत नाहीत. भाऊ सोहेलचा संसार तुटण्यापासून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. रिपोर्ट्सनुसार, सलमान सोहेलच्या घरीही त्याची समजूत घालण्यासाठी गेला होता. बराच वेळ दोघांमध्ये चर्चा झाली.

आणखी वाचा : Loksatta Exclusive : “…तर मग ती डीलीट नाही करायची”, प्राजक्ता माळीच्या राजकीय भूमिकेवर प्रसाद ओकने मांडलं परखड मत

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

२०१६ मध्‍ये सोहेल खान आणि सीमा खानचे लग्न वाचवण्‍यासाठी सलमान खानने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु आता ज्या प्रकारे दोघांनी फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, त्यावरून तो प्रयत्न फसला असल्याचे दिसून येत आहे. तर एका सूत्राने सांगितले होते की, सलमान अरबाजचे लग्न वाचवू शकला नाही, पण तो सोहेल खान आणि सीमा यांचे नाते वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सलमानसाठी कुटुंबापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही.

आणखी वाचा : “दिघे साहेब गेले तेव्हा अख्खं ठाणं जळत होतं अन्…”, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

दरम्यान, सोहेलचे नाव जेव्हा अभिनेत्री हुमा कुरेशसोबत जोडले गेले तेव्हा त्या दोघांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यानंतर सीमा खानने घर सोडल्याचे म्हटले जाते. खरतर, सेलिब्रिटी क्रिकेट लीगदरम्यान हुमा कुरेशीची सोहेलशी भेट झाली होती. हुमाला सोहेलच्या क्रिकेट टीम मुंबई हीरोजची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आली होती. हुमा कुरेशी आणि सोहेल खानला एकत्र पाहताच सर्वत्र चर्चा रंगू लागल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan tried to save sohail khan seema khan marriage became a mediator was linked with huma qureshi dcp

ताज्या बातम्या