दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सोशल मीडियावर सक्रिय आहे. पण, अलीकडेच तिच्या आजाराबाबत एका ट्विटर हँडलवरून केलेल्या कमेंटमुळे ती नाराज झाल्याचं पाहायला मिळाला. समांथाला ‘मायोसिटिस’ आजार झाल्यानंतर तिने तिचा ग्लो आणि चार्म गमावला आहे, असं त्यात म्हटलं होतं. याला उत्तर देताना समांथाने त्या युजरची कानउघाडणी केली आहे.

उर्फी जावेदने पुन्हा केलं ट्वीट, स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली, “…चित्राताई ग्रेट है”

नागा चैतन्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर, अभिनेत्रीने स्वतःला सावरलं. त्यानंतर चित्रपटांचं शूटिंग पूर्ण करत होती. अशातच तिला ‘मायोसिटिस’ नावाच्या आजाराचं निदान झालं. यामुळे तिच्या अडचणी वाढल्या. ती पुन्हा भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊ लागली. अशा परिस्थितीतही समांथा स्वतःला सांभाळत तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे.

“‘धर्मवीर’ चित्रपट आनंद दिघेंवर नव्हता, तर…” संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

अलीकडेच सामंथाच्या आगामी ‘शकुंतला’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा एक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. त्यावर लिहिलं होतं, “समांथासाठी खूप वाईट वाटत आहे, तिने तिची चमक आणि चार्म गमावला आहे. ती घटस्फोटातून सावरून तिच्या करिअरच्या शिखरावर असताना तिला मायोसिटिस आजार झाला आणि ती पुन्हा कमकुवत झाली.”

हेच ट्वीट समांथाने रिट्विट केलंय. “मी प्रार्थना करते की तुम्हाला माझ्यासारखं अनेक महिन्यांचे उपचार आणि औषधं घ्यावी लागू नयेत. तुमच्या ग्लोसाठी माझ्याकडून थोडं प्रेम,” असं समांथा ट्वीट करत म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्रीचा ‘शकुंतलम’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोमवारी या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित झाला. तिचे व्हायरल होणारे फोटो याच ट्रेलर लाँच सोहळ्यातील होते.