शाहरुख खानकडून पुन्हा शूटींगचा श्रीगणेशा, निर्मात्यांना करावी लागणार ‘या’ अटींची पूर्तता

लवकरच शाहरुख पुन्हा त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करणार आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुखने त्याच्या सर्व शूटींग काही काळासाठी बंद केल्या होत्या. मात्र आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच शाहरुख पुन्हा त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा करणार आहे. मात्र चित्रीकरणावर परतण्यासाठी त्याने निर्मात्यांपुढे काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. जर त्यांची पूर्तता झाली तरच तो परतणार असल्याचे बोललं जात आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी तब्बल २८ दिवसांनी जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर लाडक्या लेकासोबत काही काळ घालवल्यानंतर अखेर शाहरुख पुन्हा चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. एका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने चित्रपट निर्मात्यांना भारताबाहेर चित्रीत होणाऱ्या चित्रपटांचे वेळापत्रक हे मोठ्या शेड्युलऐवजी लहान तुकड्यांमध्ये ठेवण्यास सांगितले आहे. यामुळे शाहरुखला फार जास्त वेळ परदेशात राहावे लागणार नाही.

त्यासोबतच शाहरुख हा दर आठवडा किंवा दोन आठवड्यांनी काही दिवस त्याच्या घरी येऊ शकतो. तसेच ज्या काळात मी नसेन त्यावेळी निर्मात्यांनी त्याच्यासोबतच्या इतर कलाकारांचे भाग शूट करावे, असा सल्ला त्याने दिला आहे. यानुसार चित्रपटाच्या शूटिंगला विलंब होणार नाही, असे शाहरुखचे मत आहे. दरम्यान याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Mumbai Drugs Case: शाहरुख खानची मॅनेजर पूजाची NCB चौकशीसाठी टाळाटाळ, तिसरा समन्स जारी होण्याची शक्यता

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये करण्यात आली. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी २९ ऑक्टोबर जामीन मंजूर झाल्यानंतर शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी सुटका करण्यात आली. याप्रकरणी आर्यन खानसोबत सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनाही जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान हा नवीन बॉडीगार्डच्या शोधात असल्याचे बोललं जात आहे. शाहरुखचा पर्सनल बॉडीगार्ड रवी सिंग हा सध्या आर्यनसोबत राहणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तो स्वत:साठी नवीन बॉडीगार्डाच्या शोधात आहे.

हेही वाचा – जेलमधून घरी परतताच आर्यन खानने सर्वात पहिलं केलं ‘हे’ काम, चाहते गोंधळात

शाहरुख खान हा २०१८ मध्ये ‘झीरो’ हा चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता शाहरुख ‘पठाण’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shah rukh khan to resume shooting after aryan khan bail makes a special request to the director nrp

ताज्या बातम्या