बॉलीवूडची ‘दबंग’गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या नावावर एक नवा विक्रम जमा झाला आहे. या विक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सोनाक्षीने काही सहकाऱ्यांच्या मदतीने उपस्थित महिलांना ‘नेलपेंट’ लावला. सोनाक्षीने एक, दोन, शंभर नव्हे तर १ हजार ३२८ महिलांना नेलपेंट लावले. या अगोदर तैवान नेल असोसिएशनने १ हजार १५६ महिलांना नेलपेंट लावण्याचा विक्रम केला होता. सोनाक्षी व तिच्या सहकाऱ्यांनी हा विक्रम मोडून नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एकाच वेळी सर्वाधिक महिलांच्या नखांना नेलपेंट लावण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. भारतीय महिलांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून हा आगळा विक्रम केला. उपस्थित महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोनाक्षी यावेळी उपस्थित होती.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2016 रोजी प्रकाशित
सोनाक्षीचा असाही विक्रम
बॉलीवूडची ‘दबंग’गर्ल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या नावावर एक नवा विक्रम जमा झाला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-03-2016 at 06:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinha celebrates international womens day by clinching a guinness world record