scorecardresearch

‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा अपघात, भरधाव वेगात येणाऱ्या बाईकस्वाराची अभिनेत्रीच्या स्कुटीला जोरदार धडक

तिच्या अपघाताची बातमी ऐकून तिचे चाहते तिच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत.

gauri kulkarni

‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत गौरी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. तिचा काही दिवसांपूर्वी एक मोठा अपघात झाला आणि या अपघातात तिच्या स्कुटीचं बरंच नुकसान झालं आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील यश आणि गौरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. परंतु या अपघातामुळे गौरी पुढील काही दिवस मालिकेत दिसणार नाहीये. गौरीच्या स्कुटीला एका बाइकस्वाराने समोरून येऊन धडक दिली आहे.

आणखी वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत

‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी गौरी जात असलेल्या मार्गावर एक बाईकस्वार भरधाव वेगात उलट मार्गाने आला आणि त्याने गौरीच्या स्कुटीला समोरून धडक दिली. यामुळे तिची स्कुटी रस्त्यावर स्लीप झाली. यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यासोबतच तिला आणखी छोट्या दुखापतीही झाल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी आता तिला तीन आठवडे सक्तीचा आराम करायला सांगितला आहे. तर याचबरोबर तिच्या स्कुटीचंही मोठं नुकसान झालं आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते!’ मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलंत का? शूटिंगमधून ब्रेक घेत माधुरणी लेकीबरोबर घालवतेय क्वालिटी टाईम

तिच्या अपघाताची बातमी ऐकून तिचे चाहते तिच्याबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थनाही करत आहेत. त्यामुळे सध्या गौरीने या मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 12:47 IST