दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावरील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना आमंत्रित केले होते. टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने वर्षावरील गणपतीचं दर्शन घेतले. यानंतर दोघांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- ‘दिल दोस्ती दुनियादारी फेम’ सुव्रत जोशीने दिल्या मुलींना इम्प्रेस करण्याच्या टीप्स, म्हणाला, “प्रत्येकवेळी त्यांना…”

हार्दिक जोशी इन्स्टाग्रामवर मुख्यंमत्री एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत. या फोटोत हार्दिक बरोबर त्याची पत्नी अभिनेत्री अक्षया देवधरही दिसत आहे. हार्दिकने पोस्ट करत लिहिलं आहे “महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी काल आम्हाला मुख्यमंत्री निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी व आरतीसाठी आमंत्रित केले. साहेब, तुम्ही व तुमच्या कुटुंबाने ज्या आपुलकीने आणि प्रेमाने पाहुणचार केला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटून आणि बाप्पाचे दर्शन घेऊन खूप छान वाटले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिकची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं आहे. “हाराष्ट्राची लाडकी जोडी व आवडती जोडी …अहा” तर दुसऱ्याने “बाप्पा माझ्या शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री कर रे..” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने, “गणपती बाप्पा तुम्ही पुढच्या वर्षी या पण या माणसाला घरी बसवा” अशी कमेंट केली आहे. काहींनी हात जोडताना आणि टाळ्या वाजवतानाचे इमोजी पोस्ट केले आहेत.