Aishwarya Narkar : पावसाळा सुरू झाल्यापासून मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांना मुंबई – ठाण्यातून प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता शशांक केतकर जवळपास तासभर ट्राफिकमध्ये अडकला होता. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याने याबाबत संताप व्यक्त करत मुंबई, ठाणे महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. आता असाच काहीसा अनुभव अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना आला आहे.

ऐश्वर्या नारकर शूटिंग निमित्त दररोज घोडबंदर रोडने प्रवास करतात. अनेकदा रस्त्यावर ट्राफिक असल्याच्या पोस्ट त्या शेअर करत असतात. आज अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत यामध्ये घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर काहीतरी उपाय काढला पाहिजे असं म्हटलं आहे. “काय करायचं या घोडबंदरच्या ट्राफिकचं? आता तर मी याच्या प्रेमात पडायला लागले आहे” असं ऐश्वर्या नारकर त्यांच्या पहिल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणाल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : कोण होणार यंदाचा पहिला कॅप्टन? अरबाजने इतरांना थेट दिली धमकी, प्रोमो पाहून नेटकरी संतापले

ऐश्वर्या नारकर वाहतूक कोंडीबद्दल काय म्हणाल्या?

अभिनेत्री त्यांच्या पुढच्या स्टोरीमध्ये व्हिडीओ शेअर करत म्हणतात, “रस्ता न होण्यामागे आणि वाहतूक कोंडी असण्यामागे प्रत्येकाची बाजू असेल…सरकारची बाजू असेल, राजकारण्यांची बाजू असेल याशिवाय ज्यांना या रस्त्यांचं कंत्राट मिळतं त्यांची बाजू असेल. या रस्त्यासाठी काम करणाऱ्या कामगारांचं वेगळं मत असेल…पाऊस, वातावरण सगळ्याच गोष्टी आपण मान्य केल्या तरी… आता आपली बाजू समजून घेण्याची वेळ आली आहे. पैसा, वेळ, एनर्जी, वेळेत पोहोचण्याचं टेन्शन या सगळ्यासाठी आपली बाजू समजून घेणं गरजेचं आहे.” हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने यावर #खड्डे #ट्राफिक असे हॅशटॅग्ज वापरले आहेत.

Aishwarya Narkar
ऐश्वर्या नारकर यांची पोस्ट ( Aishwarya Narkar )

हेही वाचा : Aishwarya Narkar : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून ऐश्वर्या नारकर यांची एक्झिट; म्हणाल्या, “यानंतर रुपाली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बहुतांश मराठी कलाकार घोडबंदर मार्गे शूटिंगच्या सेटवर पोहोचतात त्यामुळे या कलाकारांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याशिवाय ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली ही खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. लवकरच त्यांची या मालिकेतून एक्झिट होणार आहे. या मालिकेत नुकतीच अदिती सारंगधरची एन्ट्री झाली आहे. ऐश्वर्या यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने मालिका सोडल्यावर त्यांचे अनेक चाहते त्यांना निश्चितच मिस करणार आहेत.