मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस मराठी ४’नंतर सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. बिग बॉसचा संपूर्ण सीझन अपूर्वाने गाजवला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. अनेकदा ती धम्माल रील्स इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. आताही तिने असंच एक धम्माल रील शेअर केलं आहे ज्यात ती रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला या चित्रपटाने अक्षरशः वेड लावलं. या चित्रपटातील सर्वच गाणी खूप हिट ठरली. पण त्यातही प्रेक्षकांमध्ये ‘वेड लावलंय’ या गाण्याची सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळाली. मग या मराठी सेलिब्रेटी तरी मागे कसे राहतील. अनेक मराठी सेलिब्रेटींनी यावर रील शेअर केले आहेत आणि आता यात अपूर्वाच्याही नावाचा समावेश आहे. अपूर्वाने ‘वेड लावलंय’वर धम्माल डान्स केला आहे.

आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4 : अक्षय केळकर ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पहिली पोस्ट, म्हणाली…

अपूर्वा नेमळेकरने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘वेड लावलंय’ गाण्यावर धम्माल डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “चाहत्यांच्या आग्रहासाठी ‘वेड’ मुंबई एडिशन” या व्हिडीओमध्ये अपूर्वा तिच्या मित्राबरोबर ‘वेड लावलंय’ची सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा- कोकणातील डबलबारीतही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ची क्रेझ, व्हिडीओ पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘वेड’ चित्रपटाच्या टिझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार विश्वास सगळ्यांना होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.