‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अधिक रंजक होत चाललं आहे. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के द्यायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये मोठा ट्विस्ट आला असून घरात चार सदस्यांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे.

‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल पेजवरुन एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जग्गनाथ या सदस्यांनी दमदार एन्ट्री घेतली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात या सदस्यांची चैलेंजर्स म्हणून एन्ट्री झाली आहे. राखीची एन्ट्री होताच तिने घरात “शेवंते…” असं म्हणताच अपूर्वाला हसू फुटलेले व्हिडीओत दिसत आहे. पुढे ती म्हणते,  “मी या सर्वांची आई आहे. बिग बॉसची पहिली बायको…अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणार…”.

हेही वाचा>> “मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर

हेही वाचा>> Video: “मी अवली लवली…” हास्यजत्रेतील ‘कोहली’ फॅमिलीचा चाहत्याने एडिट केलेला भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखीबरोबरच विशाल, मीरा आणि आरोह घरात आल्यानंतर खेळ कसा बदलणार? त्यांना काय स्पेशल पॉवर मिळणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आता चार सदस्यांनी एन्ट्री केल्यानंतर घरातील समीकरणं किती बदलणार हे पाहणंही रोमांचक ठरणार आहे.