बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. ती नेहमी फोटो, रील्स पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अलीकडेच तिनं तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग ‘कावाला’ गाण्यावर रील केला होता; जो चांगलाच व्हायरल झाला होता. अशातच अभिनेत्रीनं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? या प्रश्नाचं उत्तर रीलच्या माध्यमातून दिलं आहे.

हेही वाचा – “मला लोक घाबरतात” स्वतःच्या प्रतिमेविषयी शरद पोंक्षेंचे वक्तव्य, म्हणाले, “…त्यामुळे माझी सटकते”

अभिनेत्री सोनाली पाटीलनं नुकताच एक रील पोस्ट केला आहे. या रीलवर बिग बॉसच्या घरातील तिचा खास मित्र अभिनेता विकास पाटीलनं मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. या रीलमध्ये सोनालीला विचारलं जात की, ‘तू लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज.’ तर ती म्हणते की, ‘नो मॅरेज (लग्न करणार नाही).’ सोनालीनं हा रील पोस्ट करताना सुद्धा ‘नो मॅरेंज’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनंतर सिद्धार्थ-मिताली होणार आई-बाबा? अभिनेत्रीच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

या रीलवर अभिनेता विकास पाटीलने प्रतिक्रिया देत लिहिलं की, “आईचा फोन आला होता परवा…मुलं बघ आमच्या सोनासाठी म्हणून…” तसेच सोनालीच्या चाहत्यांनी सुद्धा या रीलवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, “उत्तर एकदम बरोबर आहे. एकटा जीव सदाशिव… ” तर काहींनी तिला लग्न करूच नको असा सल्ला दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोनालीनं ‘बिग बॉस मराठी’ पूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘वैजू नंबर वन’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर ती ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ यांसारख्या मालिकामध्ये झळकली होती. एवढंच नाहीतर सोनालीनं हिंदी मालिकेतही काम केलं. ‘वागले की दुनिया’ या हिंदी मालिकेत ती दिसली होती.