छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ची सध्या चांगलीच चर्चा आहे. २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजशिर्के, किरण माने, अपूर्वा नेमळेकर, रुचिरा जाधव असे प्रसिद्ध चेहेरे या नव्या पर्वात झळकले आहेत. बिग बॉसच्या घरातून हे कलाकार पुढील १०० दिवस प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.

बिग बॉस मराठीचे चौथा सुरु झाल्यापासून एका गोष्टीची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते, आणि ज्याबद्दल बऱ्याच चर्च रंगल्या ती म्हणजे बिग बॉस चावडी. ही चावडी यंदाही बघायला मिळणार का, याबद्दल बरीच चर्चा रंगली होती. महेश मांजरेकर सदस्यांची शाळा घेणार कि नाही?. याचं उत्तर मिळालं आहे, या पर्वातील चावडी चांगलीच रंगली. महेश मांजरेकर यांनी सदस्यांची शाळा घेतली आणि चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय ते कुठे चुकत आहेत हेसुद्धा दर्शवून दिले. याबरोबरच काही सदस्यांचे कौतुकही केले. नुकताच सदस्यांना सुखद धक्का मिळाला कारण कुठलाही सदस्य घराबाहेर पडला नाही.

आणखी वाचा : Photos : चित्रपटात काम न करता रेखा कमावतात महिन्याला लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

आज मात्र बिग बॉसच्या घरातील सदस्यांना एक सरप्राइज मिळणार आहे. घरामध्ये आता चक्क एका सुपरहीरोची एंट्री होणार आहे कोण असेल हा सुपरहिरो? याविषयी सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या नवीन भागाचा टीझरही नुकताच कलर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टीझरमध्ये खुद्द बिग बॉसनी जाहीर केले आहे कि, “घरात भेटीला येणार आहे एक सुपरहिरो. सुपरहिरोच्या स्वागतासाठी आपणा सर्वांकडे तयार होण्यासाठी वेळ आहे ४५ मिनिटं” या घोषणेनंतर घरातील सदस्यांची तारांबळ उडालेली आपल्याला बघायला मिळत आहे. हा सुपरहीरो कोण आहे? आणि बिग बॉसच्या घरात येण्यामागचं नेमकं कारण काय आहे? याचीच सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. आजच्या भागात याबद्दल खुलासा होणार आहे. बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार – रविवार रात्री ९.३० वाजता तुम्ही कलर्स मराठी या वाहिनीवर आणि वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधीही बघू शकता.