छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ गेल्या ९ वर्षांत या कार्यक्रमाने प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं. या कार्यक्रमामुळे भाऊ कदम, कुशल बद्रिके सारखे अनेक कलाकार घराघरात पोहचले. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र, आता विश्रांतीनंतर हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर या संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा- Video : प्रसिद्ध मराठी गाणे म्हणता न आल्याने अरुंधती झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही गायिका…”
निलेश साबळेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चला हवा येऊ द्या कार्यक्रमासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने चला हवा येऊ द्या कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. व्हिडीओमध्ये निलेश साबळेसह भाऊ कदमही दिसत आहे. व्हिडीओमध्ये भाऊ मी पुन्हा येतोय. मी पुन्हा येतोय ‘चला हवा येऊ द्या’ आता सोमवार ते शनिवार” म्हणताना दिसत आहे. तर निलेश साबळे “बरोबर ऐकताय तुम्ही, चला हवा येऊ द्या आता फक्त सोमवार, मंगळवारीच नाही, तर सोमवार ते शनिवार म्हणजेच संपूर्ण आठवडाभर असणार नवेकोरे एपिसोड्स. तेव्हा पाहायला विसरू नका ‘चला हवा येऊ द्या’ सोमवार ते शनिवार” असं म्हणताना दिसत आहे.
‘चला हवा येऊ द्या’चा पहिला भाग २०१४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुरुवातीला या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसाद मिळाला. पण नंतर नंतर या कार्यक्रमातील तोच तो पणा प्रेक्षकांना रुचेनासा झाला. हा कार्यक्रम सुमार होत चालल्याची अनेक प्रेक्षकांनी तक्रारही केली होती.
हेही वाचा- ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने गोव्यात सुरू केला नवा व्यवसाय; म्हणाली, “आमचं छोटंसं घर आता…”
प्रेक्षकांच्या तक्रारीनंतर चला हवा येऊ द्याच्या निर्मात्यांनी कार्यक्रमाच्या नवनवीन उपक्रम राबवले. मात्र या उपक्रमांना म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. दिवसेंदिवस या कार्यक्रमाचा टीआरपी घसरतच गेल्याच बघायला मिळत होतं. त्यामुळे ‘झी मराठी’ वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला होता.