‘झी मराठी’ वाहिनीवर गेली दहा वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अविरतपणे चालू होता. या कार्यक्रमातील सगळ्याच विनोदवीरांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. विनोदाचं अचूक टायमिंग साधत महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवल्यावर नुकताच या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. १० वर्षांनी शो निरोप घेणार म्हटल्यावर यामधील सगळेच कलाकार भावुक झाले होते. कुशल बद्रिकेने या संदर्भात खास पोस्ट शेअर केली आहे.

कुशल बद्रिकेने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘चला हवा येऊ द्या’चा संपूर्ण सेट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला अभिनेत्याने “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले काही आमुचे तर क्षमा असावी” हे गाणं जोडलं आहे.

हेही वाचा : एल्विश यादव अटक प्रकरणात मोठी अपडेट, युट्यूबरने सापांचे विष पुरवल्याची दिली कबुली

“माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार…चूक भूल द्यावी घ्यावी” असं कॅप्शन कुशल बद्रिके त्याने या पोस्टला दिलं आहे. यापूर्वी अभिनेत्याने या कार्यक्रमासाठी “प्रिय झी मराठी, तशी आपली मैत्री ‘हसा चकटफू’पासूनची पण, ती सर्वार्थाने फुलली या १० वर्षांत. लहानपणी आभाळात उडणारं विमान पाहिलं की वाटायचं मी सुद्धा कधीतरी त्यात बसेन. पण, आता कधी या विमानातून उतरेन असं वाटेपर्यंत तुम्ही हा विमान प्रवास घडवलात.” अशी भावुक कविता सुद्धा लिहिली होती.

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत विशाल निकमसह झळकणार आणखी एक ‘बिग बॉस’ फेम अभिनेता, नाव आलं समोर

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा पहिला भाग १८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रदर्शित झाला होता. तर, शेवटचा भाग १७ मार्च २०२४ रोजी प्रसारित करण्यात आला. चाहते आता कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्स करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेकांनी लवकरच हा कार्यक्रम पुन्हा सुरू करा असं देखील म्हटलं आहे.