मराठी कलाविश्वात सध्या लग्नसोहळ्याची लगबग सुरू आहे. नुकताच अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अशातच ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘फुलपाखरु’ अशा अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋजुता धारप हिच्याशी आज (२२ एप्रिल २०२४ रोजी) लग्नगाठ बांधली.

चेतन आणि ऋजुताने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटोज शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. या फोटोजमध्ये दोघंही अगदी आनंदी दिसतायत. या खास दिवसासाठी चेतनने जांभळ्या रंगाचे धोतर नेसलेले दिसत आहे, तर नवऱ्याला मॅचिंग म्हणून नववधू ऋजुताने आकाशी आणि जांभळ्या रंगाची नऊवार साडी नेसली आहे. सप्तपदीसाठी दोघांनी या खास लूकची निवड केली आहे.

तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघंही एकमेकांना हार घालताना दिसतायत. या लूकसाठी ऋजुताने पिवळ्या व जांभळ्या रंगाची साडी तर चेतनने सोनेरी रंगाची डिझाईन असलेला पांढऱ्या रंगाचा अंगरखा आणि जांभळे धोतर परिधान केले आहे.

हेही वाचा… “यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टच म्हणाला…

“२२.०४.२०२४ ॥ कुर्यात सदा मंगलम् ॥” असं सुंदर कॅप्शन या फोटोजला चेतनने दिलं आहे. अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चेतन आणि ऋजुताच्या लग्नाचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हेही वाचा… “मला रोज फोन करतायत”, केदार शिंदे करतात निलेश साबळेला दररोज फोन, म्हणाला….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आज म्हणजेच २२ एप्रिल २०२४ रोजी या जोडीचा लग्नसोहळा नाशिक येथे पार पडला. गेल्यावर्षी १९ डिसेंबर २०२३ रोजी दोघांनी मित्र-मैत्रिणी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुपचूप साखरपुडा उरकला होता. चेतन ‘फुलपाखरु’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘काय घडलं त्या रात्री’, ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ या मालिकांमध्ये दिसला होता; तर ऋजुताने ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.