‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. या तिच्या भूमिकेमुळे तिला नवी ओळख मिळाली. या भूमिकेमुळे तिचा चाहतावर्गही प्रचंड वाढला. आता एक व्हिडीओ पोस्ट करत प्राजक्ताने तिच्या चाहत्यांशी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

प्राजक्ताला तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या नम्र स्वभावासाठीही ओळखले जाते. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर प्राजक्ताही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सांगत असते. आपल्या कामाबरोबरच प्राजक्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील चांगलीच प्रगती केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचं घर घेतलं. तर आता त्या घरामध्ये तिने गृहप्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा केली.

आणखी वाचा : Video: …अन् माईकसमोर बोलता बोलता प्राजक्ता गायकवाडला कोसळले रडू, जाणून घ्या कारण

प्राजक्ताने आज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये ती जरीचा घागरा परिधान करून तिच्या नवीन घरात वास्तुपूजा आणि सत्यनारायणाची पूजा करताना दिसत आहे. तर यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एकत्र गृहप्रवेशही केला. हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये प्राजक्ताने ड्रीम होम, न्यू होम, वास्तुपूजा, सत्यनारायण असे हॅशटॅग वापरले.

हेही वाचा : “फक्त एकदा तुम्हाला भेटून…” चाहत्याच्या ‘त्या’ मागणीवर प्राजक्ता गायकवाडने दिलं ‘हे’ उत्तर, पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करून तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत तिला शुभेच्छा देत आहेत.