अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघे नेहमीच चर्चेत असतात. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून ते घराघरात पोहचले. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. एप्रिल २०१९ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्न करण्याचा निर्णय का घेतला? नुकत्याच एका मुलाखतीत सखी आणि सुव्रतने यामगच्या कारणाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- “मला सगळे घाबरतात, कारण…”; कविता लाड यांनी सांगितला तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या सेटवरचा अनुभव, म्हणाल्या

सुव्रत म्हणाला, “लग्नाच्या शब्दाला आपण अर्थ द्यायचा असतो. कमिटमेंट महत्वाची आहे. ती असेल तर तुम्ही लग्न करा किंवा करु नका काहीही फऱक पडत नाही. जगात वेगवेगळ्या पद्धतीने लोक राहतात. लग्न केल्यानंतरही लग्नाची कमिटमेंट महत्वाची आहे ती तिळमात्रही न पाळणारी लोकं आहेत. लग्नानंतर येणारी कमिटमेंट आमच्यात अगोदरच होती. आणि आम्हाला विश्वासही निर्माण झाला होता ही कमिटमेंट आयुष्यभर अशीच राहणार आहे. त्यामुळे आम्हाला लग्न करण्याची गरज वाटली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या सेटवर सखी आणि सुव्रतची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर त्यांनी त्यांनी अमर फोटो स्टुडिओ नावाच्या नाटकात एकत्र काम केलं. हळूहळू त्यांच्या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं आणि ११ एप्रिल २०१९ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. लॉकडाउनदरम्यान सखी आणि सुव्रत ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेत एकत्र झळकले होते.