अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो नेहमीच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. संकर्षण अलिकडेच माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत झळकला होता. मात्र याशिवाय तो नाटकांमध्येही काम करताना दिसून येतो. त्याचं ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक सध्या बरंच गाजतंय. या नाटकाच्या प्रयोगावेळचा एक किस्सा त्याने शेअर केला आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारा संकर्षण अनेकदा त्याच्या रोजच्या आयुष्यातील घडमोडीही प्रेक्षक-चाहत्यांबरोबर शेअर करतो. आताही तसंच काहीसं घडलं आहे. ‘तू म्हणशील तसं’ नाटकाच्या प्रयोगावेळचे काही फोटो शेअर करत संकर्षणने त्याच्याबरोबर घडलेला एका प्रसंग त्याच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.
संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट-
“म्हणून “रसिक प्रेक्षक माय बाप आहेत..”
आज ‘तू म्हणशील तसं’चा ३०० वा प्रयोग पार पडला.. प्रयोगानंतर एक काका-काकू आले आणि मला म्हणाले ,
“आम्ही, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले ह्या सगळ्यांची नाटकं पाहात आलोय.. त्यांची कामं पाहाताना सकारात्मक उर्जा जाणवायची, जाणवते.. तीच उर्जा तुझ्या कामांत आणि प्रेजेन्स मध्ये आहे… ती टिकवून ठेव… आणि खाऊसाठी हे ५०० रूपये घे…”
मी घेत नव्हतो… पण त्यांचा आग्रह मी मोडला नाही.
आई बाबा खाऊसाठी पैसे देतात, तसेच ४०० रुपयांचं तिकिट काढून परत वेगळे खाऊचे ५०० रुपये द्यावे वाटणं, ही फार मोठी गोष्टं आहे… सोबतच मोठ्या मनाने दिलेली दाद आहेच… म्हणून तुम्ही “माय बापच” आहात..
अशाच शुभेच्छा कायम ठेवा…”
आणखी वाचा- “फॅशनच्या नादात लग्न…”, अवॉर्ड सोहळ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे कियारा आडवाणी ट्रोल
दरम्यान संकर्षण कऱ्हाडे सध्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात काम करत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं आहे. तर नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनी केली आहे. या नाटकात संकर्षण बरोबर भक्ती देसाई काम करत आहे. सध्या या नाटकाचे जोरदार प्रयोग होत आहेत.