‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गबाई सासूबाई’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरांत लोकप्रिय झाली. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तेजश्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे…अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचा २ जूनला वाढदिवस असतो.
तेजश्री प्रधानने यंदाचा वाढदिवस तिच्या खास मैत्रिणींबरोबर साजरा केला. आता अभिनेत्रीच्या या दोन खास मैत्रिणी कोण आहेत जाणून घेऊयात. अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील खास दिवस लोकप्रिय अभिनेत्री शिवानी बावकर आणि अशोक सराफ यांची भाची अदिती परांजपे या दोघींसह साजरा केला. शिवानी सध्या ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘साधी माणसं’मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे.
लाडक्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने खास पोस्ट शेअर केली आहे. तसंच तुझ्या वाढदिवसाची पोस्ट शेअर करायला उशीर झाला कारण, आपण तुझा वाढदिवस एकत्र सेलिब्रेट करत होतो असंही शिवानीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शिवानी बावकर लिहिते, “Belated हॅप्पी बर्थडे टू क्वीन तेजश्री प्रधान… तुझ्या वाढदिवसाची पोस्ट मी काल शेअर केली नाही कारण, आपण एकत्र हा खास दिवस साजरा करत होतो. एकत्र हसलो, एन्जॉय केलं, प्रत्येक क्षण पुरेपूर जगलो. तुला तर आधीपासूनच माहिती आहे की तू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेस. पण, तरीही सांगते…तू माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहेत. खूप प्रेम…माय बर्थडे स्टार… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल मला आणखी एक मैत्रीण ( अदिती परांजपे ) मिळाली. तिला भेटूनही प्रचंड आनंद झाला. ती प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे, बुद्धिमान आणि खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आयुष्यातील या सुंदर क्षणांसाठी मी कायम आभारी आहे आणि त्याहूनही माझ्या आयुष्यात एवढी सुंदर लोक आहेत हे माझं भाग्यच आहे.”
दरम्यान, शिवानी बावकर व तेजश्री प्रधान गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. यापूर्वी दोघींचा एकत्र ट्रेकला गेलेल्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.