scorecardresearch

Premium

Video : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने आजीच्या आठवणीत बनवला खास पदार्थ; म्हणाली, “तिच्या हातचं…”

Video : “पहिला पाऊस पडायचा तेव्हा आमची आजी…”, जुई गडकरीने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा

tharala tar mag fame actress jui gadkari
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरीने बनवला खास पदार्थ

अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत जुई गडकरीने ‘सायली’ हे प्रमुख पात्र साकारले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड सक्रिय असते. तिने तिच्या आजीच्या आठवणीत अलीकडेच एक खास पदार्थ बनवला होता. याचा व्हिडीओ जुईने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “अक्षया मला आईसारखी ओरडते”, हार्दिक जोशीने केला बायकोबद्दल खुलासा म्हणाला, “किचनमध्ये लुडबूड…”

Man gets his girlfriends name tattooed inside his lower lip
हद्द झाली राव! प्रेमासाठी ओठांच्या आत बनवला गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले,”मूर्खपणा…”
Sachin Tendulkar Says The first bat given to me was by my sister and it was a Kashmir willow bat
VIDEO : “मला मिळालेली पहिली बॅट माझ्या…”, काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या सचिनने विलो बॅटच्या आठवणींना दिला उजाळा
Shikhar Bank Scam Case Explain stand on second report submitted by investigating agency regarding closure of case
शिखर बँक घोटाळा प्रकरण : प्रकरण बंद करण्याबाबत तपास यंत्रणेने सादर केलेल्या दुसऱ्या अहवालावर भूमिका स्पष्ट करा
Crime against distributor of memory card of obscene footage of girl mumbai
तरूणीच्या अश्लील चित्रीकरणाचे मेमरीकार्ड वितरण करणाऱ्या विरोधात गुन्हा; चित्रीकरणाद्वारे धमकावून अनेकवेळा बलात्कार

जुई गडकरीने तिच्या आजीच्या आठवणीत चिवडा तयार केला होता. चिवडा बनवतानाचा संपूर्ण व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत जुई लिहिते, “आजीची आठवण आली की, तिच्या हातचे पदार्थ आठवतात. कर्जतला जेव्हा पहिला पाऊस पडायचा तेव्हा आजी आम्हा भावंडांना असा गरमा गरम instant चिवडा बनवून द्यायची! तिच्या हाताची चव याला नक्कीच नाही पण परवा खूप पाऊस झाला. तेव्हा मला तिची खूप आठवण येत होती. म्हणून हा चिवडा मी बनवला. तुम्ही पण नक्की ट्राय करा!”

हेही वाचा : Video : “संजनाने दहीहंडी फोडली पण…”, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “खूप सुंदर जुई ताई”, “आम्ही सुद्धा असाच चिवडा बनवतो” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.दरम्यान, जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या‘ठरलं तर मग’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tharala tar mag fame jui gadkari shared special video of chivada recipe sva 00

First published on: 13-09-2023 at 17:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×