Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे सध्या अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत चर्चेत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून जुईची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेत जुई गडकरी सायली सुभेदार ही मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे.

जुई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शूटिंगमधून वेळ मिळाल्यावर बहुतांशवेळा ती इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेऊन चाहत्यांसह गप्पा मारते. या सेशनदरम्यान जुईला एका चाहत्याने ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरचा अनसीन फोटो शेअर करण्यास सांगितला होता. यावेळी जुईने एसटी बसमध्ये पार पडलेल्या शूटिंगचा फोटो शेअर केला. हा फोटो सायली अर्जुनला सोडून एसटीने कोल्हापूरला निघून जात होती त्यादरम्यान काढण्यात आला होता.

तर, जुई गडकरीला दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “होणारा नवरा कोणासारखा दिसायला हवा?” असा प्रश्न विचारला. यावर जुईने कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्याचं नाव न घेता दाक्षिणात्य सुपरस्टारचा फोटो शेअर केला आहे.

jui gadkari
जुई गडकरीने शेअर केला ‘ठरलं तर मग’च्या सेटवरचा Unseen फोटो ( Tharala Tar Mag )

जुई गडकरीने दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता सूर्या यासारखा नवरा हवा आहे, असं नेटकऱ्याला सांगितलं. अभिनेत्री म्हणते, “मला सूर्यासारखा नवरा हवा आहे. तो उत्तम अभिनेता आहेच पण, त्याचबरोबर तो ‘फॅमिली मॅन’ सुद्धा आहे. आपल्या कुटुंबाची खूप काळजी घेतो.”

jui
जुई गडकरीला हवा आहे दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्यासारखा नवरा

दरम्यान, जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या मालिकेत सायली वेश बदलून साक्षी शिखरेच्या घरी गेल्याचं पाहायला मिळत आहे. आता सायलीच्या हाती पुरावे लागणार की, त्याआधीच साक्षी सायलीला रंगेहाथ पकडणार हे मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुई आणि अमित भानुशालीसह या मालिकेत प्राजक्ता कुलकर्णी, प्रियांका तेंडोलकर, केतकी विलास, ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर, शिल्पा नवलकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.