scorecardresearch

बहुचर्चित ‘१७७०’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही वर्षात कादंबरी, पुस्तकं, आत्मचरित्र यांचा आधार घेऊन अनेक चित्रपट तयार झाले. त्यातील बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता एका कादंबरीवर आधारित आणखीन एक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, तो म्हणजे ‘१७७०’

बहुचर्चित ‘१७७०’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही वर्षात कादंबरी, पुस्तकं, आत्मचरित्र यांचा आधार घेऊन अनेक चित्रपट तयार झाले. त्यातील बहुतांश चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता एका कादंबरीवर आधारित आणखीन एक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे, तो म्हणजे ‘१७७०.’ हा चित्रपट बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. बहुचर्चित आणि भव्यदिव्य अशा ‘१७७०’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. हा चित्रपट एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, अभिनेत्री कियारा आडवाणी झाली ट्रोल

या बहुभाषिक चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक अश्विन गंगाराजू हे करणार आहेत. यापूर्वी त्यांनी राजामौली यांच्या ‘एग्गा’ आणि ‘बाहुबली’ या दोन्ही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

‘१७७०’ बद्दल अश्विन गंगाराजू म्हणाले, “हा विषय माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता, पण दिग्गज व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी रूपांतरीत कथा आणि पटकथा लिहिल्याने मला निश्चितच असे वाटते की, ज्या विशिष्ट पद्धतीने या चित्रपटाचं लेखन झाले आहे त्यावरून ‘१७७०’ हा एक ब्लॉकबस्टर सिनेमेटिक अनुभव ठरणार आहे. ज्या कथांमध्ये विशिष्ट कालखंड दाखवणारी पार्श्वभूमी असेल, भावनांना जिथे जास्त महत्व असेल आणि जिथे ‘लार्जर दॅन लाईफ कलाकृतीला वाव असेल, अशा कथांकडे एक निर्माता म्हणून मी जास्त आकर्षित होतो. या गोष्टीबद्दल सुरुवातीला मी थोडा साशंक होतो, पण जेव्हा मी राम कमल मुखर्जी यांच्याशी बोललो आणि त्यांचा या बद्दलचा दृष्टिकोन जाणून घेतला तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला.”

आणखी वाचा : ज्युनियर एनटीआरच्या आगामी ‘एनटीआर-31’बद्दल मोठी अपडेट, येणार ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

दिवाळीपर्यंत या चित्रपटातील कलाकारांची घोषणा होणार असून अश्विनने त्याच्या टीमसह या कालखंडावर संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये आपल्या भेटीला येईल असे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या