चिरंजीवी यांच्या घरी चोरी

पण, चोराने दिली भलतीच कबुली…

chiranjeevi
चिरंजीवी यांच्या घरी चोरी

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या घरी दोन लाखांची चोर झाल्याची चोरी झाल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. चिरंजीवी यांच्या घरात झालेल्या चोरीची तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत आरोपीला अटक केली. या अभिनेत्याच्या घरात काम करणाऱ्या चेन्नैया या नोकरानेच चोरी केली असून, त्याने पोलिस चौकशीत एक मोठा खुलासाही केला आहे.

प्राथमिक चौकशीमध्ये चिरंजीवी यांच्या घरातून दोन लाख रुपये चोरीला गेले असल्याचे म्हटले जात आहे. पण, चेन्नैयाने मात्र तब्बल सोळा लाख रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे कळत आहे. चेन्नैयाच्या या कबुलीमुळे आता गोंधळाचीच परिस्थिती निर्माण झाली आहे. चेन्नैया गेल्या काही महिन्यांपासून चिरंजीवी यांच्या घरातील पैसे चोरत होता त्यामुळे पोलिसांत त्यांचा मॅनेजर गंगाधर यांनी त्याची तक्रार दाखल केली, ज्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

चेन्नैया गेल्या दहा वर्षांपासून चिरंजीवी यांच्या घरात काम करत असून, त्याच्यावर अनेकांचाच विश्वास होता. घरातील वस्तूंची नेमकी जागा कुठे असते, इथंपासून ते पैसे ठेवण्याच्या जागेपर्यंत सर्व काही चेन्नैयाला ठाऊक होते. पण, त्याच्यावर असणाऱ्या विश्वासापोटी कधीही त्याच्यावर चिरंजीवी यांच्या कुटुंबीयांकडून संशय घेण्यात आला नाही. पण, चेन्नैयाने मात्र या विश्वाचा गैरफायदा घेत आपल्याच मालकाच्या घरात चोरी केली. चिरंजीवी यांच्या घरातून दोन लाख रुपये चोरीला गेल्याचे लक्षात येताच चेनैय्यावर सर्वांचा संशय गेला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, पोलिस चौकशीमध्येच चेन्नैयाने आपण तब्बल १६ लाख रुपये चोरल्याची कबुली दिल्याचे कळत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Theft in south indian actor chiranjeevis house

ताज्या बातम्या