scorecardresearch

ट्विंकल खन्नाने मनीष मल्होत्राच्या फोनवरून केला होता ‘असा’ अश्लील मेसेज, पण जेव्हा समोरच्या व्यक्तीने…

ट्विंकल खन्नाच्या शोवर मनीष मल्होत्राने हजेरी लावली होती, त्यावेळी तिने हा खुलासा केला आहे.

twinkle khanna, manish malhotra,
ट्विंकल खन्नाच्या शोवर मनीष मल्होत्राने हजेरी लावली होती, त्यावेळी तिने हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ट्विंकल ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात राहते. ट्विंकलचा सेन्स ऑफ ह्यूमर हा अनेकांच्या पसंतीस उतरतो. तर ट्विंकलने लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत असाच एक विनोद केला होता. त्यामुळे मनीष हा अडचणीत आला होता.

मनीषने ट्विंकलच्या Tweak India या शोमध्ये हजरे लावली होती. यावेळी ट्विंकलने मनिष मल्होत्रासोबत केलेल्या या विनोदाविषयी सांगितले. शोमध्ये मनीष म्हणाला, “आम्ही पाच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे” यावर ट्विंकल म्हणाली “मला ती गोष्ट आठवत नाही, पण मला आठवते की एकदा मी तुझा फोन घेतला आणि कोणत्या तरी व्यक्तीला “I want to lick a lollipop” असा मेसेज केला होता. त्यावर समोरच्या व्यक्तीने “हा, कुठे आहेस तू?” असा मेसेज केला. यावर मनीष म्हणाला, “हो आणि तो मेसेज पाहिल्यानंतर मी लगेच डीलीट केला.”

आणखी वाचा : पतीच्या निधनानंतर स्विमिंग पूलमध्ये मित्रासोबत दिसली मंदिरा बेदी, सोशल मीडियावर ट्रोल होताच केली ‘ही’ गोष्ट

आणखी वाचा : “माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवले”, अभिनेत्रीने केला शत्रुघ्न सिन्हांवर आरोप

ट्विंकल सोशल मीडियावर सक्रिय असून पती अक्षय कुमारसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्या दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अक्षयसोबत लग्न झाल्यानंतर ट्विंकलने चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ट्विंकलने एक लेखिका म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Twinkle khanna sent obscene message from manish malhotra s phone dcp

ताज्या बातम्या