बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने प्रेग्नन्सीची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतनेही यावर तिची प्रतिक्रियाही दिली आहे. आलियाची प्रेग्नंट असल्याची बातमी ऐकल्यानंतर तिला देखील आई होण्याची इच्छा राखीने व्यक्त केली आहे. एवढंच काय तर ती लग्नाची वाट पाहू शकत नाही आणि लग्नाआधीच आई होऊ शकते, असे राखीने सांगितले आहे.

आणखी वाचा : “हे सगळं देवाच्या नावावर…”, उदयपूर हत्या प्रकरणावर कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया

राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राखी फोटोग्राफर्स तिला विचारतात की आलिया प्रेग्नंट आहे. यावर राखी बोलते, “मी कधी आई होणार? माझ्या आयुष्यात सुख कधी येणार. लग्नाआधी आलं तरी हरकत नाही. लग्ना आधीही आनंदाची बातमी येऊ शकते. आनंदाची बातमी आली की लगेच दुसऱ्या दिवशी मी लग्न करेन. आजकाल हे असंच होतं आहे.”

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी ही गेल्या काही दिवसांपासून तिचा बॉयफ्रेंड आदिल सोबत दिसून आली आहे. राखीनं यापूर्वी तिच्या वेगवेगळ्या रिलेशनशिपचा बिनधास्तपणे उल्लेख केला आहे. ‘बिग बॉस’मध्ये देखील राखीचं लग्न झाल्याची चर्चा व्हायरल झाली होती. तिनं ज्या व्यक्तीसोबत लग्न केल्याचा दावा केला होता त्याचे एक लग्न झाले होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपनचा वाद रंगला होता.