यशराज फिल्म्स लवकरच ‘धूम’ सिरीजमधील चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ‘धूम रिलोडेड’ या नावाने यशराज फिल्म्सने एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धूम ४’ मध्येही अभिषेक बच्चन पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत दिसतील याबद्दल तर काही वादच नाही. पण उदय चोप्रा पुढील धूम सिरीजमध्ये दिसणार नसल्याचे यशराजने घोषित केले होते. त्यामुळे तो निदान यात नसेल याची आपण खात्री बाळगायला हरकत नाही. मात्र, याआधीच्या सिरीजमध्ये खलनायकाच्या भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधणा-या कलाकाराची मुख्य भूमिका कोण करणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. याआधी जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खानने अनुक्रमे खलनायकाच्या भूमिका साकारल्या होत्या. यावेळी धूम रिलोडेडसाठी हृतिक रोशन, शाहरुख खान आणि ‘बाहुबली’ फेम प्रभास यांच्या नावांची चर्चा आहे. हृतिक सध्या ‘मोहेंजोदडो’मध्ये व्यस्त आहे तर शाहरुखचा ‘फॅन’ आणि ‘रईस’ यांचे काम चालू आहे. त्यामुळे नक्की कोण या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार यावर प्रश्नचिन्ह आहे.
धूम रिलोडेडेमध्ये कोणती बॉलीवूड सुंदरी वर्णी लावतेय हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.