रॅपर यो यो हनी सिंगचा २०२२मध्ये पत्नी शालिनी तलवारबरोबर घटस्फोट झाला. त्यानंतर तो सध्या मॉडेल टीना थडानीला डेट करतोय. हनी सिंग आणि टिना अनेकदा एकत्र दिसतात. ते इव्हेंट्सलाही एकमेकांसोबत हजेरी लावतात. दरम्यान, हनी सिंग टीना थडानीला डेट करतोय, ही बातमी आल्यानंतर अनेकांनी त्याचं लग्न मोडण्यास टिनाला जबाबदार धरलं. नेटकरी तिच्यावर टीका करत होते. या आरोपांवर टीनाने मौन सोडत उत्तर दिलंय.

टीना थडानीने तिची हनी सिंगबरोबरची पहिली भेट आणि त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल माहिती दिली आहे. तिने ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, “आमचा बाँड हळूहळू चांगला होत गेला आणि प्रेम फुलत गेलं. जसजसं मी त्याला ओळखत गेले, तसं मला समजलं की हनी खूप वेगळा आहे. त्याच्यासारखा माणूस भेटणं कठीण आहे. तो खूप हुशार आहे. मी पण त्याच्या कामाची चाहती आहे. तो एक ट्रेंडसेटर आहे आणि तो इतरांपेक्षा वेगळा आहे.”

“तिने माझं आयुष्य…” हनी सिंगचा त्याची गर्लफ्रेंडबाबत टीना थडानीबाबत मोठा खुलासा

ट्रोल्स आणि इतर आरोपांवर प्रतिक्रिया देताना टीना थडानी म्हणाली, “मी कधीही लोकांचा त्यांच्या भूतकाळाच्या आधारावर वागणूक देत नाही. त्याच्याशी मला घेणंदेणं नाही. मी फक्त त्याचं काम पाहिलं आहे आणि त्याच्या कामाची मी चाहती आहे. तो खूप गोड आणि लाजाळू आहे. माझ्यावर तो हनी सिंग असल्याशिवाय त्याच्याबद्दल इतर कोणतीच छाप नव्हती. मी त्याला भेटले तेव्हा तो १०० टक्के सिंगल होता आणि काम करत होता. बाकी, मी कुणाच्या भूतकाळाबद्दल बोलत नाही. मी ट्रोल्सकडे लक्ष देत नाही आणि ऑनलाइन भांडणं मला आवडत नाही.”

लव्ह, सेक्स और धोखा…! प्रेमविवाह, परस्त्रीयांशी शरीरसंबंध अन् घटस्फोट; अशी होती हनी सिंग आणि शालिनीची लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हनी सिंगची पूर्वाश्रमीची पत्नी शालिनीने हनीच्या वडिलांवरही आरोप केले होते. तसेच गायकाचे अनैतिक संबंध असल्याचा दावाही त्याने केला होता. तिने घटस्फोट मागताना १० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. पण १ कोटी रुपयांवर दोघांचा घटस्फोट झाला होता. सप्टेंबर २०२२मध्ये हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार कायदेशिररित्या विभक्त झाले.