20 October 2020

News Flash

आजपासून राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा

परीक्षेसाठी राज्यातील ४ लाख ३२ हजार १० तर परराज्यातील १९ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि अन्य अभ्यासक्रमांसाठी राज्य प्रवेश नियमन प्राधिकरणातर्फे घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहे.

ही परीक्षा दोन टप्प्यांत होत असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या विषय गटाची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषय गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील ४ लाख ३२ हजार १० तर परराज्यातील १९ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्यातील सर्वाधिक (४० हजार ६६१) विद्यार्थी पुणे जिल्ह्य़ातील आहेत. त्या खालोखाल मुंबई (२५ हजार ४१७), नगर (२५ हजार २८७), नाशिक (२२ हजार ६०७), नागपूर (२२ हजार ५५६), ठाणे (२३ हजार १२०) या जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बाहेरील अर्जामध्ये सर्वाधिक अर्ज मध्य प्रदेशातील विद्यार्थ्यांचे आहेत. राज्यात यंदा तालुका स्तरावर परीक्षा केंद्र आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 12:23 am

Web Title: engineering entrance exams in the state from today abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन प्रश्न गंभीर
2 संशोधन नियमासाठी संस्थांतर्गत प्रणालीची शिफारस
3 सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
Just Now!
X