देवीची अनेक रूपं आहेत. कधी ती दुर्गेच्या रूपात असते, कधी ती महिषासुरमर्दिनी असते. कधी ती चंडिका असते तर कधी वरददायिनी असते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’तर्फे यंदा ओळख करून दिली जाणार आहे ती तुमच्या आमच्यातील दुर्गाची. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. आजच्या काळातली स्त्री ही देवीच्या अशाच अनेक रूपांना आपल्यामध्ये बाणवत आयुष्यातल्या आव्हानांना सामोरी जात असते. यशस्वी होत असते. येत्या नवरात्रात ‘लोकसत्ता’ आजच्या स्त्रीमधल्या देवींच्या अशाच विविध रूपांचे दर्शन ‘शोध नवदुर्गा’चा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला घडविणार आहे. यासाठी आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुर्गाची माहिती कळविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
त्यातल्या कोणी अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने सामाजिक अत्याचारांविरोधात लढत आहे, अबलांना सबला बनवीत आहे तर कुणी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत उच्च पद प्राप्त केलं आहे. तर कोणी कौटुंबिक पाश्र्वभूमी नसतानाही आव्हानांना तोंड देत एखाद्या क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवून उभी आहे. आम्हाला प्रतीक्षा आहे अशा नवदुर्गाची, तुमच्या आमच्यातल्याच अशा स्वाभिमानी स्त्रियांची. अशा दुर्गाची ओळख समाजाला झाली, तर त्यातून प्रेरणा मिळेल, हा विश्वास असल्यानेच ‘लोकसत्ता’ने ‘अभ्युदय बँके’च्या सहकार्याने हा आगळा उपक्रम हाती घेतला.
या दुर्गा कोणत्याही भागांतील, वयोगटातील, आर्थिक गटातील असू शकतील. कोणत्याही उद्योग-व्यवसायातील असू शकतील, नोकरी करणाऱ्या असू शकतील किंवा सामाजिक कार्यकर्त्यां वा गृहिणीदेखील असू शकतील. त्यांचे कार्य असामान्य आहे. म्हणूनच ते सर्वासमोर येणे ‘लोकसत्ता’ला अगत्याचे वाटते. आपल्याला ओळख असलेल्या अशा ‘दुर्गे’ची माहिती वाचकांनी तिच्या छायाचित्रासह आणि आपल्या संपर्क क्रमांकासह ‘लोकसत्ता’कडे पाठवावी. त्यातून नऊ दुर्गाची निवड केली जाणार असून नवरात्रींच्या दिवसात ती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या स्त्रीचं कर्तृत्व नेमक्या शब्दांत पाठवल्यास त्यांची छाननी करणे सोपे जाईल. याची शब्दमर्यादा ५०० असून पाकिटावर किंवा ईमेल करताना सब्जेक्टमध्ये ‘शोध नवदुर्गाचा’ लिहिणे अत्यावश्यकआहे. ही माहिती कुरिअरद्वारा ‘प्लॉट क्र. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल परिसर, महापे, नवी मुंबई’ durga.loksatta@expressindia.com या ईमेलद्वारा ‘लोकसत्ता’ महापे कार्यालयात पाठवू शकता.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2014 रोजी प्रकाशित
शोध तुमच्या-आमच्यातील दुर्गेचा
देवीची अनेक रूपं आहेत. कधी ती दुर्गेच्या रूपात असते, कधी ती महिषासुरमर्दिनी असते. कधी ती चंडिका असते तर कधी वरददायिनी असते.

First published on: 20-09-2014 at 01:51 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta finding durga in society