02 March 2021

News Flash

मुंबई : आता मध्य रेल्वेचा प्रवासही ‘कूल’, उद्यापासून धावणार १० वातानुकुलित लोकल

केवळ अधिकृत परवाना असलेल्या प्रवाशांनाच करता येणार प्रवास

मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर उद्यापासून १० वातानुकुलित लोकल गाड्या धावणार आहेत. या मार्गावर केवळ अधिकृत परवाना असलेल्या प्रवाशांनाच प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचं सविस्तर वेळापत्रकही मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे.

मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर सध्याच्या सेवेऐवजी उद्यापासून १० वातानुकुलीत लोकल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सोमवार ते शनिवार या दिवशीच या गाड्या धावणार असून प्रत्येक स्थानकात त्या थांबतील. तसेच रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच या मार्गावरुन प्रवास करता येणार आहे.

 

दरम्यान, प्रवासादरम्यान करोनाच्या सर्व नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 5:37 pm

Web Title: mumbai 10 air conditioned local trains will run on central railway from tomorrow aau 85
Next Stories
1 रंगभूमीवर बालनाट्य बंद आणि मंत्रालयात बालनाट्य सुरु!
2 पुन्हा एकदा हे सरकार तोंडावर आपटलं; दरेकरांनी साधला निशाणा
3 “कुंडलीचं सोडा, गंडा बांधून गंडवलं त्याचं काय?”
Just Now!
X