मुंबई : राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा कायम असून काही भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत रविवारी, सोमवारी, तर ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई शहर, तसेच उपनगरांत असह्य उकाडा जाणवत आहे. तसेच शहरात रात्रीही प्रचंड उकाडा सोसावा लागत आहे. दरम्यान, सध्या विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा…अडचणीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केल्यानेच पक्षप्रवेश, रवींद्र वायकर यांची सारवासारव

मुंबईत पुढील पाच दिवस कमाल तापमान ३१-३५ अंश सेल्सिअसदरम्यान असेल. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३३.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळी पावसाचा इशारा असलेले जिल्हे धुळे , नाशिक, सोलापूर , नागपूर, चंद्रपूर, बीड, गडचिरोली, सांगली , धाराशिव