मुंबई : राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी यंदा सहा विद्यार्थी स्पर्धेत आहेत. राज्यातील १ लाख ४२ हजार ६६५ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले असून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या सर्व अभ्यासक्रमांच्या मिळून अवघ्या २२ हजार ८३३ जागा उपलब्ध आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदाही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राज्यात उपलब्ध असलेल्या जागांच्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्या जवळपास सव्वालाख विद्यार्थ्यांना वेगळा पर्याय निवडावा लागणार आहे. यंदा नीटमध्ये महाराष्ट्रातून १ लाख ४२ हजार ६६५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी, २०२३ च्या नीटमध्ये महाराष्ट्रातील १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले होते. २०२४ च्या नीटमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील २५१ संस्थांमध्ये अवघ्या २२ हजार ८३३ इतक्या जागा आहेत. त्यातही तुलनेने परवडणाऱ्या अशा सरकारी ३६ संस्थांमध्ये ४२१० जागा, सरकारी अनुदानित २५ संस्थांमध्ये १९६८, तसेच १९० विनाअनुदानित संस्थांमध्ये १६ हजार ६५५ जागा आहेत. नीटमध्ये पात्र ठरणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे अधिक असतो. राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ७ हजार ३२४ जागा असून, त्यात सरकारी महाविद्यालयांमध्ये ३३९० जागा, सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये ७६४ जागा आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३१७० जागा आहेत. बीडीएससाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये २११ जागा, सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये ६४ जागा आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २४०० अशा २६७५ जागा आहेत. बीएएमएस अभ्यासक्रमाच्या ७ हजार ८५७ जागा असून, यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ५५५ जागा, सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये ९८७ आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६३१५ जागा आहेत. त्याचप्रमाणे बीएचएमस अभ्यासक्रमासाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये ५४ जागा आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४५४० अशा ४५९४ जागा आहेत. बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वात कमी जागा उपलब्ध आहेत. बीयूएमएससाठी सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये १५३ आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २३० अशा ३८३ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारी व चांगले वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस लागणार आहे. हेही वाचा : मुंबई: मालाडमध्ये अनधिकृत फलक हटविताना कोसळला, एकजण जखमी; मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दरम्यान गत वर्षामध्ये राज्यामध्ये काही नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली असून, काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तुकडी वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांची नोंद झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विशेषत: एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हेही वाचा : महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासह मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन नावनोंदणीही बंधनकारक, पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत आवाहन पदवी अभ्यासक्रमाच्या जागा = एकूण अभ्यासक्रम = संस्था - सरकारी = संस्था - सरकारी अनुदानित = संस्था - विनाअनुदानित = संस्था - जागा एमबीबीएस = २६ - ३३९० = ५ - ७६४ = २२ - ३१७० = ५३ - ७३२४बीडीएस = ०३ - २११ = १ - ६४ = २५ - २४०० = २९ - २६७५बीएएमएस = ०६ - ५५५ = १६ - ९८७ = ८३ - ६३१५ = १०५ - ७८५७बीएचएमएस = १ - ५४ = - = - = ५६ - ४५४० = ५७ - ४५९४बीयूएमएस = - - - = ३ = १५३ = ४ - २३० = ७ - ३८३