मुंबई : जुलैच्या सुरुवातीपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे राज्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.आठवडाभरामध्ये या दोन्ही आजारांच्या रुग्णांच्या संख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. १५ दिवसांमध्ये राज्यामध्ये हिवतापाचे ७२५, तर डेंग्यूचे ५२८ रुग्ण सापडले. शहरांमध्ये रुग्णसंख्येत अधिक वाढ असल्याचे निदर्शनास आले आहे.

७ ते २१ जुलै या १५ दिवसांत हिवतापाचे सर्वाधिक ३५७ रुग्ण मुंबईत, तर ग्रामीण भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये २६७ रुग्ण सापडले आहेत. तसेच डेंग्यूचे सर्वाधिक २६४ रुग्ण मुंबईत, तर ग्रामीण भागात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २९ रुग्ण सापडले आहेत.

चिकुनगुनीयाचा ताप..

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिवताप आणि डेंग्यूबरोबरच काही प्रमाणात चिकुनगुनीयाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात
७ ते २१ जुलै या कालावधीत चिकुनगुनीयाचे २८ रुग्ण सापडले. तसेच ७ ते १४ जुलै या काळात १६, तर १५ ते २१ जुलै या कालावधीत १२ रुग्ण सापडले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.