मुंबई : सुमारे २० वर्षांहून अधिक काळ राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयातील ‘तंबाखू बंद’ क्लिनिक अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासनाने बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनबरोबर सामंजस्य करार केला आहे.

तंबाखू सेवन करण्याची सवय ही इतर अनेक व्यसनांसाठी कारणीभूत ठरते. त्यातून अनेक रोगांना आमंत्रण मिळते. किशोरवयीन आणि तरुण पिढीमध्येही हे व्यसन आढळून येते. केईएम रुग्णालयातील मानसोपचार विभागामध्ये १९९१ पासून ‘ड्रग डेडिक्शन सेंटर ऑफ एक्सलन्स’ हा विभाग सुरू आहे. तसेच २० वर्षांपासून प्रत्येक बुधवारी सकाळी ‘तंबाखू बंद क्लिनिक’ संचालित केले जात आहे. तंबाखू अधीन झालेल्या रुग्णांना तंबाखू सोडण्यास मदत करण्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट, फार्माकोथेरपी (व्हॅरेनिकलीन / बुप्रोपियन), समुपदेशन आणि वर्तन सुधारणा सेवा इत्यादी उपक्रम या माध्यमातून राबवले जातात.

हेही वाचा…२६३ कोटी रुपयांचा प्राप्तिकर गैरव्यवहार, मालमत्तांची कागदपत्रे बनावट असल्याचे ईडी तपासात निष्प

केईएम रुग्णालयाच्या या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. बजाज इलेक्ट्रिकल फाऊंडेशनच्या (बीईएफ) सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) केईएम रुग्णालयातील ‘तंबाखू बंद क्लिनिक’ अद्ययावत करण्यात येणार आहे. रुग्णांच्या नोंदी, विनामूल्य औषधोपचार आणि समुदाय जागरूकता कार्यक्रमांसाठी या उपक्रमाची मदत होणार आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि बजाज फाऊंडेशनच्या विशेष कार्यकारी अधिकारी मधुरा तळेगावकर यांनी या संयुक्त उपक्रमासाठी एक वर्षाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याद्वारे ‘तंबाखू बंद क्लिनिक’ द्वारे रुग्णांना अधिक अद्ययावत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवणे शक्य होणार आहे.

हेही वाचा…मुंबई : रस्तेकामांच्या प्रक्रियेला वेग, महापालिका नव्या कामांची निविदा प्रक्रिया पावसाळ्यात पूर्ण करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ कोटी नागरिकांना तंबाखूचे व्यसन

एका सर्वेक्षणानुसार २०१६-१७ मध्ये भारतातील वयवर्षे १५ आणि त्याहून अधिक वयाच्या एकूण २८ कोटी ७ लाख नागरिक तंबाखूचे सेवन करतात. याच सर्वेक्षणानुसार ५ पैकी १ प्रौढ (म्हणजे अंदाजे २० कोटी) व्यक्ती धूररहित तंबाखूचे सेवन करतात. तर १० पैकी १ प्रौढ (१० कोटींहून अधिक) तंबाखूचे सेवन करतात.