scorecardresearch

Premium

Mega Block : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या ‘मेगा ब्लॉक’

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

mumbai, sunday, mega block, repairs, railway, central, harbour, matunga, mulund, csmt, chunabhatti, bandra
मध्य, हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक (संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम- मुंबई सेंट्रल अप जलद मार्गावर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नाही.

मध्य रेल्वे

कुठे – माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर  कधी – सकाळी ११ .५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

परिणाम – ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून धिम्या मार्गावरून सुटणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील, तर मुलुंड स्थानकापुढे या लोकल पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील. पुढे अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.

हेही वाचा >>> ११ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांचे हाल

हार्बर रेल्वे

 कुठे – सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर  कधी – सकाळी ११. १० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम – ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लोकल, वांद्रे आणि गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत, तर पनवेल,  बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा लोकल चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

कुठे-  मुंबई सेंट्रल ते माहीम अप जलद मार्गावर आणि पाचव्या मार्गिकेवर  कधी – शनिवारी रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत

परिणाम – ब्लॉक कालावधीत अप जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा सांताक्रूझ – चर्चगेट स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन मेगा ब्लॉक नसेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-04-2023 at 00:32 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×