मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील विविध अभियांत्रिकी व देखभाल कामासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मेगाब्लाॅकमुळे मुख्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी – पनवेल आणि ठाणे – पनवेल लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लाॅकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ पासून ते दुपारी ३.४५ पर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ पासून ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल, माटुंगा स्थानकापासून मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबून त्या त्यांच्या इच्छितस्थानकात अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यानंतरच्या जलद लोकल मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ पासून दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड स्थानकापासून माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबून या लोकल माटुंगा स्थानकापासून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल इच्छित स्थानकात अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल – वाशी अप व डाऊन मार्गावर (पोर्ट मार्गिका वगळून)
कधी : सकाळी ११.०५ पासून ते दुपारी ४.०५ पर्यंत
परिणाम : पनवेल येथून सकाळी १०.३३ पासून दुपारी ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल, तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ पासून दुपारी ३.१२ पर्यंत सुटणाऱ्या पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल येथून सकाळी ११.०२ पासून ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल, तसेच, ठाणे येथून सकाळी १०.०१ पासून दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सर्व जलद मार्गावरील लोकल गोरेगाव – सांताक्रूझ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येतील. तर, काही अंधेरी आणि बोरिवली लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.