सूर्यकांत महाडिक यांचे निधन

रत्नागिरी जिल्ह्यातील काडवली या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)
शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत महाडिक (७४) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील काडवली या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. महाडिक हे कुर्ला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. पण िहदुत्वाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची आमदारकी रद्द केली. दमदार आवाज आणि शिवसेनेवरील निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी कामगार नेता म्हणून लौकिक मिळवला. २००३ पासून ते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते.  बोर्ला-घाटलागांव, चेंबूर येथे सकाळी ७ ते ११ यावेळात अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल अशी  माहिती कामगार सेनेचे उपाध्यक्ष अजित साळवी यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suryakant mahadik passes away abn