नागपूर: अभियांत्रिकीच्या परीक्षेत दोनदा नापास झाल्याने नैराश्यात जाऊन एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत वैशालीनगरात घडली. संदेश अशोक बोकडे (२४) रा. सिटी प्लाझा अपार्टमेंट असे मृताचे नाव आहे.

संदेश अंजुमन कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. सहाव्या सेमिस्टरच्या काही विषयांमध्ये तो नापास झाला होता. पुन्हा परीक्षा दिल्यानंतरही त्याला यश आले नाही. यामुळे तो निराश होता. संदेशचे वडील अशोक हे आकाशवाणी कार्यालयात लिपिक आहेत आणि आई गृहिणी आहे. त्याला मोठी बहीण असून तिचे लग्न झाले आहे. मंगळवारी रात्री संदेशने आई-वडिलांसह एकत्र बसून जेवण केले.

हेही वाचा… वर्धा: काँग्रेसची ‘भारत जोडो’ नंतर आता ‘जनसंवाद’ यात्रा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर तो झोपण्यासाठी खोलीत गेला. मध्यरात्रीला त्याने छताच्या पंख्याला ओढनी बांधून गळफास लावला. सकाळी ५ वाजताच्या सुमारास वडील अशोक मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी उठले असता मुलगा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आरडा-ओरड ऐेकून शेजारी गोळा झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पाचपावली पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.