महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : राज्यात १ जानेवारी ते ३१ मे दरम्यान पाच महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अपघात कमी झाले आहे. परंतु, शहरनिहाय बघितले तर पुणे, ठाणे, नागपूर शहरात अपघातांमध्ये वाढ, तर मुंबईत मात्र घट झाल्याचे परिवहन खात्याच्या अहवालातून पुढे आले आहे.
राज्यात १ जानेवारी ते ३१ मे २०२२ दरम्यान १४ हजार ५५५ अपघात झाले. त्यात ६ हजार ९१५ मृत्यू तर ११ हजार ९७५ जण जखमी झाले. २०२३ मध्ये या काळात १४ हजार ३४७ अपघातांमध्ये ६ हजार ४३७ मृत्यू तर १२ हजार ७२ जण जखमी झाले. शहरनिहाय बघितल्यास पुणे शहरात २०२२ मध्ये ३६४ अपघातात १४४ मृत्यू तर २६८ जण जखमी झाले. २०२३ मध्ये ४८६ अपघातात १५८ मृत्यू, तर ३६१ जण जखमी झाले. पुणे ग्रामीणला २०२२ मध्ये ६९४ अपघातामध्ये ३९० मृत्यू तर ६०७ जण जखमी झाले. २०२३ मध्ये ७२९ अपघातामध्ये ३८५ मृत्यू तर ६८९ जण जखमी झाले. ठाणे शहरात २०२२ मध्ये ३५९ अपघातात ९४ मृत्यू तर ३१८ जण जखमी झाले. २०२३ मध्ये ३८१ अपघातात ८८ मृत्यू तर ३४३ जण जखमी झाले. पिंपरी चिंचवडला २०२२ मध्ये ४०१ अपघातात १५५ मृत्यू तर ३०२ जखमी झाले. २०२३ मध्ये ५०८ अपघातात १४७ मृत्यू तर ३९५ जखमी झाले. नागपूर शहरात २०२२ मध्ये ४३५ अपघातात १३१ मृत्यू तर ४४३ जखमी झाले. तर २०२३ मध्ये ४७६ अपघातात १०७ मृत्यू तर ४९५ जण जखमी झाले. नागपूर ग्रामीणला २०२२ मध्ये ४८९ अपघातात २३० मृत्यू तर ५९८ जण जखमी झाले. तर २०२३ मध्ये ४२७ अपघातात १९५ मृत्यू तर ५४४ जण जखमी झाले. मुंबई शहरात २०२२ मध्ये ८५५ अपघातात १७५ मृत्यू तर ७५५ जण जखमी झाले. तर २०२३ मध्ये ४३९ अपघातात ११३ मृत्यू तर ४०२ जण जखमी झाल्याचे परिवहन खात्याच्या अहवालात पुढे आले आहे. याविषयी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही, दुसऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर त्याला दुजोरा दिला.
आणखी वाचा-संपूर्ण योग ग्रामसाठी महाराष्ट्रातून निवडलेले एकमेव गाव आहे कसे?
राज्यातील पाच शहर- जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी ते ३१ मे दरम्यान पाच महिन्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४० हून जास्त संख्येने अपघात वाढले आहेत. त्यात सर्वाधिक १२२ अपघात पुणे शहर, पिंपरी चिंचवडला १०७ अपघात, औरंगाबाद शहरात ५३ अपघात, परभणीला ४६ अपघात, लातूरला ४२ अपघात, नागपूर शहरात ४१ अपघात गेल्यावर्षीहून वाढले आहेत.
अपघाताची स्थिती १ जानेवारी ते ३१ मे दरम्यान
शहर- जिल्हा अपघात मृत्यू (२०२२) अपघात मृत्यू (२०२३)
पुणे (श.) ३६४ १४४ ४८६ १५८
पुणे (ग्रा.) ६९४ ३९० ७२९ ३८५
नाशिक (ग्रा.) ६७० ४२८ ६९१ ४३३
नाशिक (श.) २२५ ०९७ १९३ ०८०
औरंगाबाद (ग्रा.) ३१७ २११ ३५२ २०६
औरंगाबाद (श.) २०८ ०८१ २६१ ०८२
ठाणे (श.) ३५९ ०९४ ३८१ ०८८
पिंपरी चिंचवड ४०१ १५५ ५०८ १४७
नागपूर (श.) ४३५ १३१ ४७६ १०७
नागपूर (ग्रा.) ४८९ २३० ४२७ १९५
मुंबई (श.) ८५५ १७५ ४३९ ११३
नवी मुंबई २९९ १२३ ३२१ ०९२
स्त्रोत: परिवहन खाते अहवाल