नागपूर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा आज पश्चिम नागपुरातील अवस्थीनगर आणि मध्य नागपुरातील गांधी गेट, महाल येथे रोड-शो होणार आहे. प्रियंका येणार म्हणून दुपारी १२ वाजतापासून अवस्थीनगर चौकात लोक गोळा होत आहेत.

काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांचा रोड-शो आयोजित करण्यात आला आहे. रविवारी दुपारी २ वाजता प्रियंका गांधी पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत ‘रोड-शो’ करणार आहेत. त्यानंतर मध्य नागपूर मतदार संघातील महाल, गांधी गेट चौक ते कोतवाली पोलीस ठाणे मार्गे बडकस चौकापर्यंत मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळकेच्या प्रचारासाठी रोड-शो करणार आहेत.

PM Modi Inaugurates Grand ISKCON Temple in Navi mumbai
देशाच्या केंद्रस्थानी अध्यात्म!‘इस्कॉन’ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Wankhede Stadium Ajaz Patel is the only bowler to take 10 wickets in an innings at Mumbai
Wankhede Stadium : मुंबईचे वानखेडे स्टेडियम एजाज पटेलच्या ‘या’ खास विक्रमाचे आहे साक्षीदार
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Among the many exciting matches played at Wankhede Stadium these five are very special
Wankhede Stadium : धोनीचा विश्वविजयी षटकार ते फ्लिनटॉफचं शर्टलेस सेलिब्रेशन, ‘हे’ आहेत वानखेडे स्टेडियमवरील पाच रोमांचक सामने
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ

हेही वाचा…‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…

प्रियंका गांधी नागपूरहून आधी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे गेल्या. तेथे त्यांची जाहीर सभा आहे. त्यानंतर त्या हेलिकॉप्टरने नागपुरात दाखल होऊन दुपारी २ वाजता रोड-शो ला हजेरी लावणार होत्या. परंतु दीड वाजेपर्यंत त्यांचे वडसा येथे भाषण सुरू झाले नव्हते.

प्रियंका गांधी नागपुरात येणार असल्याचे कळल्यानंतर शहर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तसेच लोकांनी देखील प्रियंका यांना बघण्यासाठी गर्दी केली आहे. यापूर्वी गांधी कुटुंबातील इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी नागपुरात प्रचारासाठी आले होते. मात्र, प्रियंका गांधी यांचा हा पहिलाच दौरा आहे. पश्चिम नागपुरातील ‘रोड-शो’मध्ये प्रियंका गांधींची उपस्थिती ही नवी ऊर्जा निर्माण करणारी ठरेल. नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती विकास ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा…दलित समाजाचा उमेदवार पडल्यास याद राखा, ‘यांनी’ काढली काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी

या ठिकाणी रोड-शो

प्रियंका गांधी यांचा पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात रविवारी दुपारी २ वाजता अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत ‘रोड-शो’ होणार आहे. तर मध्य नागपूर मतदारसंघात दुपारी ३ वाजता महाल, गांधी गेट चौक ते कोतवाली पुलिस स्टेशन मार्गे बडकस चौकापर्यंत राहणार आहे.

Story img Loader