नागपूर : घरातील मोठ्या मुलीचे लग्न ठरले. घरात लग्नाची तयारी सुरु होती, परंतु अशातच कुटुंब प्रमुख असलेल्या पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली. ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गजानन दशरथ मोघू (वय ४५, रा. पिवळी शाळेजवळ, ठक्करग्राम) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन हा हातमजुरीचे काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्याचे कुटुंबीय गृहउद्योग करतात. मुलीचे लग्न ठरल्यामुळे तिच्या लग्नाची कुटुंबीय तयारी करीत होते. अशातच दारुचे व्यसन वाढल्यामुळे गजानन मागील १५ दिवसांपासून कामावरही गेला नव्हता.

हेही वाचा : अनैतिक संबंधातून मित्राच्या पत्नीचा खून, मृतदेह पोत्यात बांधून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीच्या लग्नाचा खर्च आणि त्यानंतर संसार, दोन मुलांचे शिक्षण कसे करावे, या चिंतेत असणाऱ्या गजाननने नैराश्यातून बुधवारी दुपारी आपल्या राहत्या घरी टिनाच्या शेडच्या लाकडी राफ्टरला कापडी लेस बांधून गळफास घेत आत्महत्या केली. वनिता गजानन मोघू (वय ३९) यांनी दिलेल्या सुचनेवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.