नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर – आमला स्थानकादरम्यान येणाऱ्या गोधनी रेल्वे स्थानकामधील तिसऱ्या रेल्वे मार्गच्या संबंधित पहिल्या टप्प्यातील ‘यार्ड रेमॉडेलिंगच्या कामाकरिता काही रेल्वे गाड्या रद्द तर रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. गोधनी रेल्वे स्थानकावरील कामांमुळे ६ आणि ८ जानेवारीला विभागातून धावणाऱ्या काही गाड्या रद्द आणि काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्या आहेत.

या गाड्या रद्द

गाडी क्र. ६१११८ आमला – नागपूर मेमो ६ आणि ८ जानेवारी ला रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्र . ६१११९ नागपूर- आमला मेमो ६ आणि ८ जानेवारी ला रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्र. ६११२० आमला – नागपूर मेमो ८ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे

गाडी क्र . ६१११७ नागपूर- आमला मेमो ८ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे.

हेही वाचा : भंडारा : खळबळजनक! वाघाचे तीन तुकडे करून जंगलात फेकले, शिकार की झुंज…

विलंबाने धावणाऱ्या गाड्या

गाडी क्र. १२१५९ अमरावती – जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी ६ जानेवारी आपल्या निर्धारित वेळ सुटण्याऐवजी अर्धा तास उशिरा धावेल.

गाडी क्र. १२१५९ अमरावती – जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी ८ जानेवारी आपल्या निर्धारित वेळ सुटण्याऐवजी दीड तास उशिरा धावेल.

गाडी क्र. १२९२४ नागपूर- दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दिनांक ८ जानेवारी रोजी आपल्या निर्धारित वेळ सुटण्याऐवजी दीड तास उशिरा सुटणार आहे.

यापूर्वी देखील अशाचप्रकारे यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाकरिता बरोबर एक वर्षांपूर्वी काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी २०२४ ) काही दिवस अनेक गाड्या रद्द करण्यात येणार तर काही गाड्यांना विलंब होणार आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन येथे इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : बल्लारपूरची जमजम पठाण केबीसीच्या हॉट सीटवर…बिग बीच्या प्रश्नाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूरमार्गे धावणाऱ्या व रद्द होणा-या गाड्यांमध्ये १२१७१ एलटीटी- हावडा एक्सप्रेस (२२, २५ व २९ जानेवारी, १ फेब्रुवारी); हावडा- एलटीटी एक्सप्रेस (२३, २६, ३० जानेवारी, २ फेब्रुवारी) ; २२१२५ नागपूर- अमृतसर एक्सप्रेस (२७ जानेवारी व ३ फेब्रुवारी); २२१२६ अमृतसर- नागपूर एक्सप्रेस (२९ जानेवारी व ५ फेब्रुवारी), १२२१३ यशवंतपूर- दिल्ली सराई रोहिल्ला एक्सप्रेस (२७ जानेवारी व ३ फेब्रुवारी) यासह अनेक गाड्या रद्द कऱ्यात आल्या होत्या.