लोकसत्ता टीम

वर्धा : महाविकास आघाडीत वर्धा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आल्याचे निश्चित म्हटल्या जाते. या पक्षातर्फे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, सहकार नेते समीर देशमुख व कराळे गुरुजी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यावर मात करीत एक नाव आता पुढे आले आहे. नागपूर कार्यक्षेत्र असलेले किशोर कन्हेरे यांनी लढण्याची तयारी दर्शवत पक्षाकडे तिकीट मागितले आहे.

आणखी वाचा- बुलढाण्याचे रणांगण ठरणार ‘कुरुक्षेत्र’! शिवसेनेतच लढत होण्याची चिन्हे; तीन दशके एकत्र झुंजले, आता…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कन्हेरे म्हणतात की, मी महाविकास आघाडीतर्फे लढणार. वर्धा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्याने मी पक्षनेत्यांकडे इच्छा दर्शविली आहे. कन्हेरे हे माजी शिवसेना नेते व नंतर छगन भुजबळ यांचे विश्वासू म्हणून चर्चेत राहिले. म्हाडाचे माजी संचालक, नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त राहिले आहेत. राष्ट्रवादीतर्फे लढण्यास इच्छुक उपरोक्त नेत्यांकडे पक्ष पैसे देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक इच्छुकास ‘तू स्वबळावर लढणार काय,’ अशी विचारणा झाली. त्याच संदर्भात हर्षवर्धन यांनी एक पाय मागे घेतल्याचे बोलल्या गेले. अशी अडचण चर्चेत आल्याने कन्हेरे हे सक्षम ठरू शकत असल्याचे बोलले जात आहे.