school holiday list update वर्धा: सुट्टी हा सर्वांचा आवडीचा विषय. त्यातही शासकीय कार्यालय व शाळा यांना मिळणाऱ्या सुट्ट्या हा चर्चेचा तर अनेकांसाठी असुयेचा विषय बनतो. म्हणून वर्षभरात किती सुट्ट्या येतात व किती निमित्तमात्र मिळणार याचा हिशोब केल्या जात असतो. शाळेच्या बाबतीत तर ही बाब अधिक लागू होत असल्याने दिसून येते. कारण मुलांना सुट्ट्या केव्हा मिळणार व केव्हा फिरायला जाणार, याची उत्सुकता लागून असते. शालेय शिक्षण विभाग त्याची आखणी करीत तसे वेळापत्रकच जाहीर करते. तसेच आता करण्यात आले आहे.
वर्षभरात ७६ सुट्ट्या

सुट्टी वेळापत्रक हा शालेय शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय असतो. म्हणून राज्यातील शाळांची वर्षभरातील सुट्ट्याची यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना ५२ रविवार वगळून वर्षभरात ७६ सुट्ट्या लागू होणार आहेत. त्यात दिवाळीच्या सुट्ट्या १६ ते २७ ऑक्टोबर म्हणजे १० दिवस मिळतील. तर उन्हाळी सुट्ट्या २ मे ते १३ जून म्हणजेच ३८ दिवसाच्या राहणार आहेत. अश्या सर्व मिळून वर्षभरात १२८ दिवस सुट्ट्या राहणार आहेत. काही सूचना पण शालेय शिक्षण विभागाने केल्या आहेत. गावच्या यात्रेचा अपवाद वगळून सलग तीन दिवस शाळा बंद राहणार नाहीत, याची खबरदारी शाळेच्या मुख्याध्यापकांना घ्यायची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदेशानुसार स्थानिक परिस्थिती तपासावी. नमूद यादीतील तारखेला संबंधित सण येत नसल्यास मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता त्यास घेतली पाहिजे. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांची पूर्व मान्यता घ्यावी. मुख्याध्यापक अधिकारात सुट्टी घेत असतांना त्या मुख्याध्यापकाने तीन दिवस पूर्वी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्याकडे लेखी कळवावे. तसे करणे बंधककारक करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच अशी राहणार आहे. अर्ध्या दिवसाची शाळा सकाळी ९ ते दुपारी दीड पर्यंत भरणार. शाळेचे कामकाज असणाऱ्या दिवशी ६० मिनिटांची मोठी सुट्टी  तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १० मिनिटाच्या दोन सुट्ट्या मिळतील. दुबार पद्धतीने शाळा भरत असेल तर १० मिनिटांची लहान व ३५ मिनिटांची मोठी सुट्टी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या अधिकारात प्रत्येकी दोन सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. वर्षभरातील  ५२ रविवारच्या सुट्ट्या आहेतच. उर्वरित वेळेत अध्ययन कार्य चालणार.