नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा निवडणुचा कार्यक्रम अद्यापही जाहीर न झाल्याने निवडणुकीला ग्रहण लागल्याचा आरोप माजी सदस्यांकडून होत आहे. विद्यापीठ कायद्यानुसार विधिसभा विसर्जित होण्याच्या तीन महिन्यांआधी निवडणुकांची तयारी व्हावी असा नियम असतानाही ढिम्म प्रशासनामुळे निवडणुका कधी होणार याची निश्चिती नाही.

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरणांचा कार्यकाळ हा ऑगस्ट महिन्यात संपला. त्यामुळे त्याआधीच निवडणुका पूर्ण होणे अपेक्षित होते. नजिकच्या गोंडवाना विद्यापीठाच्या महिन्याभराआधीच निवडणुका संपल्या. मात्र, नागपूर विद्यापीठाने अनेक दिवस केवळ पदवीधर मतदारांची नोंदणीच सुरू ठेवली. आता नोंदणीची प्रक्रिया संपली असली तरी अर्जांची छाननी आणि त्यावर येणारे आक्षेप याचेच काम सुरू आहे. त्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर केला जाईल? याबद्दल विद्यापीठाकडून काहीही सांगितले जात नाही. विद्यापीठ कायद्यानुसार प्राधिकरणे विसर्जित होण्याच्या तीन महिन्यांआधीच ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची असते.

हेही वाचा : १३ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणारा ‘टायगर’ अखेर जेरबंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर विद्यापीठाची शेवटची विधिसभा बैठक कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी दोन मिनिटात गुंडाळल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. तसेच याविरोधात आंदोलनही झाले होते. विधिसभा नसल्याने कलगुरूंना जाब विचारणारे कुणी नाही. शिवाय व्यवस्थापन परिषेमध्येही निवडूण येणारे कुणीही सदस्य नाहीत. त्यामुळे विद्यापीठावर कुलगुरूंचा एकछत्री अंमल असावा म्हणून निवडणुका लांबणीवर टाकल्या जात असल्याचा आरोपही काही सदस्यांकडून होत आहे.