नागपूर : कॉंग्रेसमधून निलंबित माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. डॉ. देशमुख पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार का? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जाहीर टीका केल्यामुळे डॉ. देशमुख यांना अलीकडेच कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोपाचे सविस्तर पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहे. यानंतर प्रथमच देशमुख यांनी सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.

हेही वाचा – कुठे आहे भारतातील एकमेव सीता मंदिर? काय होता शाप? का होते गर्दी जाणून घ्या..

देशमुख हे मुळचे भाजपाचेच. ते या पक्षाकडूनच काटोलमधून २०१४ मध्ये आमदार झाले होते. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्याने त्यानी विधानसभा सदस्यत्वाचा, तसेच भाजपाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात लढवली होती. त्यात ते पराभूत झाले होते. ते पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्यांनी बावनकुळे यांची भेट घेणे हे त्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशीष देशमुख हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावयाच्या कामासाठी आले होते. देवेंद्र फडणवीस आणि मी या कामांसाठी प्रयत्न करावे, अशी विनंती त्यांनी केली, असे बावनकुळे यांनी सांगितले.