03 June 2020

News Flash

पालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी २३ मार्चला

नवी मुंबई महापालिका निवडणूकीत असलेल्या १११ प्रभागानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी १ फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षण सोडत घेण्यात आली. त्यात अनेक मातब्बरांचे आरक्षण महिलांसाठी आरक्षित झाल्याचे पाहिला मिळाले. त्यानंतर प्रभाग आरक्षण व प्रारुप प्रभाग रचनेवर ५२४ हरकतींची नोंद करण्यात आली होती.त्याची सुनावणी झाल्यानंतर याबाबतची सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली होती.त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने जैसे ठेवण्यात आले आहे. तर प्रभाग रचनेत काही ठिकाणच्या सीमांमध्ये बदल करण्यात आले असून आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती     पालिका निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष प्रभाग निहाय मतदार यांद्यंकडे लागले आहे.

निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. ३१ जानेवारीपर्यंतची यादीच ग्रा धरली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूकीत असलेल्या १११ प्रभागानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदारांच्या याद्यांमधील प्रभागनिहाय याद्य तयार करण्याचे अवघड काम सुरु करण्यात आले आहे. प्रभागनिहाय प्रारुप याद्य तयार केल्यानंतर  ९ मार्चला   या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी महानगरपालिका मुख्यालय आणि  नवी मुंबई पालिकेतील संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयातील सूचना फलकावर तसेच नवी मुंबई पालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येणार आहेत.प्रभागनिहाय करण्यात आलेल्या  प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १६ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे अनेकांचे लक्ष प्रभाग निहाय करण्यात येणारम्य़ा प्रारुप प्रभाग याद्यंकडे लागले आहे.कारण अनेक प्रभागनिहाय याद्य करताना अनेक मतदार हे दुसरम्य़ा  प्रभागांच्या मतदारयादीत गेल्याने गोंधळ उडतो.त्यामुळे ऐन निवडणुकीच्या दिवशी मतदार मतदानासाठी एका केंद्रावर तर त्याचे नाव दुसरम्य़ाच प्रभागाच्या  यादीत असल्याचे  आढळून येते.त्यामुळे प्रभागनिहाय याद्यंकडे  विविध राजकीय पक्षांचे बारीक लक्ष असणार आहे.  २३ मार्चला  प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी तर २४ मार्चला  मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

नवी मुंबई पालिकेची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना व नकाशे नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेले प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले असून ते जैसे थे ठेवण्यात आले आहे. तर काही प्रभागांच्या सीमाबाबत थोडासा बदल करण्यात आलेला आहे. प्रभाग निहाय मतदारयाद्या तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून मतदार यांद्यबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.

-अमरिश पटनिगिरे, महापालिका निवडणूक अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:06 am

Web Title: navi mumbai palika election last voting list twenty three march akp 94
Next Stories
1 पाणथळ जमिनी ‘सेझ’च्या घशात
2 दिघ्यातील तीन नगरसेवक शिवसेनेत?
3 किलबिल किलबिल पक्षी बोलती..
Just Now!
X