नवी मुंबई: वाशी परिसरातील जुहुगाव तलावाची दोन महिन्यांपूर्वी डागडुजी आणि सफाई करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने तब्बल २४लाख खर्च केला होता. परंतु आता त्याच तलावात शेवाळ आणि दुर्गंधी पसरली. अशा पाण्यातच ग्रामस्थांना नाईलाजास्तव बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करावे लागले असून ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई शहरात २२ नैसर्गिक तलाव आहेत. नवी मुंबई महापालिकेने तलाव व्हिजन अंतर्गत ग्याबियन वॉल टाकून दुरुस्ती, डागडुजी करून कायापालट केला आहे. जुहुगावातील तलावात सध्या शेवाळ पसरले असून त्यामुळे दुर्गंधी ही पसरली. अशा तलावात श्री मूर्ती विसर्जित कशा करायच्या असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या तलावात गावातील मलनिःसारण वाहिन्यांच्या गळतीचे पाणी येत असल्याचा संशय येथील ग्रामस्थांना आहे. मागील दोन वर्षांपूर्वी देखील मलनिःसारण वाहिन्यांच्या गळतीने तलावाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे महापालिकेने या तलावाची दुरुस्ती आणि सफाई करून २४ लाख रुपये खर्च केले होते.

हेही वाचा… पनवेल: पाण्याने भरलेल्या टॅंकरने तरुणीला चिरडले

मात्र इतका खर्च करून देखील तलावात शेवाळ साचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील ग्रामस्थांना दीड दिवसाच्या बाप्पांचे विसजर्न याच तलावात करावे लागले. तलावाचा दुसरा पर्याय उपलब्ध आहे, मात्र तो ३किमी अंतरावर असल्याने याच ठिकाणी विसजर्न झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या तलावाची स्वच्छता करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी या तलावातील गाळ काढून , डागडुजी केली होती. यासाठी अमाप खर्च देखील केला आहे. मात्र एवढा खर्च करून देखील तलावाची आज दुरवस्थाच आहे. या तलावात गावातील मलनिःसारण वाहिन्यांच्या गळती होत असल्याची शक्यता आहे. नाइलाजास्तव याच तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करावे लागत आहे. – हिमांशू पाटील, अध्यक्ष , जुहूगाव ग्रामस्थ मंडळ,