पनवेल : बँक व्यवस्थापकाची सोनसाखळी रेल्वे प्रवासादरम्यान चोरल्याची घटना १४ मार्चला घडली असून याबाबतचा रितसर गुन्हा १८ मार्चला तळोजा पोलीस ठाण्यात नोंदविला आहे. पोलीस अनोळखी चोरट्यांचा शोध घेत आहेत. तळोजा घोटकॅम्प येथे राहणारे २८ वर्षीय बँक व्यवस्थापक एका खासगी बँकेत काम करतात.

हेही वाचा : पनवेल : अभियंता अपघातामध्ये ठार

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक

१४ मार्चला ते वंदे भारत या रेल्वेने जालना ते ठाणे या पल्यावर प्रवास करुन ते बेलापूरला कार्यालयात कामावर गेले. मात्र घरी सायंकाळी पाच वाजता आल्यावर त्यांना गळ्यात सोनसाखळी नसल्याचे समजले. नेमकी सोनसाखळी कोणी चोरली हे तपासण्यासाठी संबंधित रेल्वे पोलीसांकडे धाव घेतली. वाशी रेल्वे पोलीसांकडे या घटनेची ऑनलाईन तक्रार दिल्यानंतर या प्रकरणातील चोरट्यांचा शोध तळोजा पोलीस घेत आहेत.