पनवेल : हार्बर रेल्वे मार्गावर ३६ तासांचा मेगाब्लॉक आणि मालगाडीचे डबे घसरणे या दोन्ही घटना एकाचवेळी पनवेल स्थानकासोबत घडल्याने आपत्तीवेळी सुधारणा करण्यास रेल्वे प्रशासन तोकडी पडल्याची सबब दिली जात असली तरी आधुनिकतेच्या युगात रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सेवा देण्यासाठी टेक्नोसेव्ही झाली नसल्याचे शनिवारच्या दोन्ही घटनांवरून समोर आले. शनिवारी दुपारी मालडबे घसरल्याची घटना माहिती असताना आणि तो रेल्वे रुळ सूरु झाला नसल्याची माहिती असतानासुद्धा रेल्वे प्रशासनाने मुंबईहून पनवेलच्या रुळांवरुन जाणाऱ्या गाड्या रात्री उशीरापर्यंत प्रवाशांनी का भरल्या, हा प्रश्न विचारला जात आहे.

प्रत्येक तिकीटधारकाचा मोबाईल नंबर रेल्वे प्रशासनाकडे असताना त्यांनी गाड्या रद्द होण्याची किंवा रेल्वेतील प्रवाशांना अजून किती तास प्रतिक्षा करावा लागणार याची माहिती प्रवाशांना का देऊ शकले नाही असा प्रश्न विचारला जात आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून दररोज ३२ हून अधिक एक्सप्रेस गाड्या धावतात. यामधील रविवारी डाऊनच्या ७ आणि अपच्या ९ एक्सप्रेस विविध स्थानकात प्रवाशांनी भरुन उभ्या होत्या. यामध्ये डाऊनमध्ये १२४५०, ०११३९, १२१३३, ०११६५,, ११००३, १६३३७, १२०५१ यांचा समावेश होता. तसेच अपमध्ये १०१०६, ०११५२, ०१३४८, ०११५४, १०१०४, १११००, १२०५२, ०११८६, १६३३८ या गाड्यांचा समावेश होता.

हेही वाचा : पनवेल: रेल्वे प्रशासनात आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा 

रेल्वे प्रशासनाने दुपारनंतर एसटी बसच्या तळोजा आणि कळंबोली येथील रेल्वेस्थानकात उभ्या केलेल्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांसाठी प्रत्येकी दोन एसटी बस उपलब्ध करण्याचे नियोजन केले. या बसमधून ज्या प्रवाशांना मुंबईकडे जायचे आहे, अशा प्रवाशांसाठी बसची सोय करण्यात आली होती. आपत्तीच्या स्थितीमध्ये प्रवाशांना केंद्रस्थानी ठेऊन तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे मात्र अनेक तासानंतर ताटकळत राहीलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय एवढ्या उशीराने का घेतला, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

हेही वाचा : उरण: बिग बटरफ्लाय मंथ निमित्ताने विद्यार्थ्यां मध्ये जनजागरण; फुलपाखरांच निसर्गातील महत्व विशद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने पनवेल येथे पोहोचणारे रेल्वेचे मदतकार्यातील कर्मचारी पोहोचण्यास विलंब झाला. त्याचाही फटका मदतकार्याला बसला. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने एसटी बसकडे शेकडो प्रवासी वळाले. मात्र, तीन आसनी रिक्षाचालकांनी मीटर प्रमाणे रिक्षाभाडे न आकारता, मनमानी भाडे आकारुन वैतागलेल्या प्रवाशांची लुटमार केल्याचे पाहायला मिळाले.